पुणे : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. भारतात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत साधारणत: 66,540 रुपये आहे. त्याचवेळी, 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,890 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, जो मागील काही दिवसांच्या तुलनेत कमी झाला आहे.
सध्या पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,850 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा प्रतितोळा भाव 66,590 रूपयांवर गेला आहे. तर चांदीचा प्रतिकिलो दर 91,900 रुपयांपर्यंत गेला आहे. त्यातच येत्या काही दिवसांत सोन्याचे भाव आणखी वाढू शकतात, असे बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे.
सोने-चांदीची खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. भाव जरी कमी किंवा जास्त होत असले तरीही ते खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच सोने खरेदी करताना त्याची गुणवत्ता लक्षात ठेवावी लागते. ग्राहकांनी हॉलमार्क चिन्ह पाहूनच खरेदी करावी. सोन्याचे हॉलमार्क ही सरकारी हमी असते. त्यामुळे सोने हे हॉलमार्क पाहून खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो.