बापू मुळीक
सासवड: महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या मृत्युपत्रामध्ये खानवडीचा उल्लेख आहे. त्याप्रमाणे खानवडीमध्ये असणाऱ्या स्मारकाकडे शासनाने कोणतीही लक्ष दिलेले नाही. खानवडीला पर्यटन स्थळाचा शासनाने दर्जा द्यावा. त्याचबरोबर शासनाने खानवडीच्या स्मारकाकडे लक्ष देऊन, सुधारणा कराव्यात अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली.
खानवडी (ता पुरंदर) येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाला लक्ष्मण हाके यांनी भेट दिली. यावेळी दौंड, बारामती, पुरंदर या तालुक्यातील ठिकाणांच्या तरुणांनी आणलेल्या ज्योतींचे दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील धिवार यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे संविधानाची प्रत देऊन स्वागत केले.
त्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळेची पाहणी हाके यांनी केली. हाके पुढे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या सीएसआर फंडामधून उभी राहणारी ही शाळा अतिशय लाजवाब आहे. खानवडीला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला, तर स्मारकाचा विकास होऊ शकतो.
यावेळी सरपंच स्वप्नाली होले, बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल धिवार, माजी सरपंच चंद्रकांत फुले, रवींद्र फुले, दत्ता होले, संदीप टिळेकर, संतोष डुबल, जयवंत होले, भाऊ खोमणे, रविकिरण होले, श्यामकुमार मेमाणे, ग्रामसेवक अनिल जगताप, तलाठी प्रवीण जोजारे, संतोष म्हेत्रे, युवराज होले, मीरा कुंजीर, वर्षा खोमणे, ज्योती होले, शुभांगी होले आदी उपस्थित होते.