पिंपरी : प्रेयसी आणि योगा टीचर दोघांनी मिळून प्रियकराविरोधात रेप केसचा स्कॅम रचला. यामध्ये तरुणाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन त्रास दिला. या त्रासाला कंटाळून चाकणमधील तरुणाने लोणावळ्यातील दरीत उडी मारून आत्महत्या केली होती. हा प्रकार १८ ऑक्टोबर रोजी घडली आहे.
सूर्यकांत रामदयाल प्रजापती (वय २७, रा. चाकण) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी श्रीकांत रामदयाल प्रजापती (वय २५) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी एक महिला आणि बापू सोनवणे (रा. चाकण, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला आणि फिर्यादी श्रीकांत यांचा भाऊ सूर्यकांत यांचे प्रेम संबंध होते. आरोपी महिला आणि योगा टीचर आरोपी वापू सोनवणे यांनी फिर्यादी सूर्यकांत याला लैंगिक अत्याचाराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. सूर्यकांत याला टेलिग्राम, व्हॉट्सअॅप आणि गुगल पे वर शिवीगाळ करत अपमान केला. या त्रासाला कंटाळून त्याने 9 ऑक्टोबर रोजी चाकण येथील घर सोडले. त्याचे नातेवाईक सूर्यकांत याचा शोध घेत होते. त्यानंतर 16 ऑक्टोबर रोजी त्याने दोन सेकंदांचा व्हिडिओ काढून आपल्या नातेवाइकांना पाठविला होता.
या व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या बॅकग्राउंडवरून सूर्यकांत याच्या आत्महत्येचा शोध लागला. या व्हिडीओवरून लोणावळा येथील शिवदुर्गच्या पथकाने राजमाची दरीत 370 फूट खोल दरीत शोध घेऊन त्याचा मृतदेह बाहेर काढला होता.