Gautami Patil : सबसे कातिल गौतमी पाटील सध्या चांगलीच चर्चेत आहे. गौतमी पाटीलचे राज्यभरात ठिकठिकाणी डान्सचे कार्यक्रम होतात. ज्या गावात गौतमी त्या गावात चाहत्यांची गर्दी असं समीकरणच बनलं आहे. पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरमध्ये नुकताच गौतमी पाटीलचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला तिच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी गौतमीच्या एका चाहतीने तिची भेट घेतली. यावेळी तिने सर्वांना तिचे खरं नाव नेमकं काय आहे ते सांगितलं. सध्या प्रत्येक जण गौतमीला गौतमी या नावानेच ओळखतात. पण तिचं खरं नाव गौतमी नसून वैष्णवी असं आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील केवाडी येथे आदिवासी नेते आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गौतमी हिला देखील बोलावण्यात आलं होतं. त्यावेळी गौतमीने तिच्या एका चाहतीची भेट घेतली. चाहतीसोबत गप्पा मारत असताना गौतमी हिने स्वतःचं खरं नाव सांगितलं. गौतमी हिने तिच्या चिमुकल्या चाहतीला तिचं नाव विचारलं. तेव्हा चाहतीने माझं नाव वैष्णवी आहे असं सांगितलं. यावर गौतमी म्हणाली, ‘माझं देखील जन्मनाव वैष्णवी असं आहे.
काही दिवसापूर्वी गौतमी पाटील हिच्या आडनावावरुन वाद निर्माण झाला होता. गौतमी हिने पाटील हे आडनाव लावू नये असा इशारा देखील तिला देण्यात आला होता. गौतमीचं खरं आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करतेय. तिने पाटीलं नाव लावल्यास तिचे महाराष्ट्रात कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा मराठा समन्वयकचे राजेंद्र जराड पाटील यांनी दिला होता.
वडिलांनीही केला होता गौतमीच्या नावाचा खुलासा
रवींद्र पाटील हे गौतमीचे वडील असून त्यांनी तिच्या नावाबद्दल काही दिवसापूर्वी खुलासा केला होता. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की, शाळेतल्या दाखल्यावर तिचं नाव गौतमी पाटील असून तिचं जन्म नाव वैष्णवी आहे.