Gautami Patil News : पुणे : गौतमी पाटीलच्या समर्थनार्थ आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी फेसबुक पोस्ट लिहीत गौतमीला पाठिंबा दिला आहे. गौतमीने पाटील हे आडनाव वापरुनये अन्यथा तिचे कार्यक्रम राज्यात चालू देणार नाही, असा इशारा एका संघटनेने दिला आहे. त्यावरून आता नवीन वाद सुरु झाला आहे. (Patil surname dispute, Sushma Andhare in the field in support of Gautami)
गौतमी पाटीलला पाठिंबा देताना सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत की, नावात काही आहे की नाही यावर खूप चर्चा झाली. पण आडनावात काही आहे का नाही? तर निश्चितपणे आडनावात खूप काही दडलेले असते. (Gautami Patil News) आडनावात वर्णश्रेष्ठतावाद आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्थेनुसार ब्राह्मण वर्णातील आडनाव ही ‘विद्यामय’ असावीत. क्षत्रिय वर्णियांची आडनावे ‘वीरमय’, वैश्यांची आडनावे ही ‘व्यापारमय’ असावी, तर शूद्रांची आडनावे ही ‘निंदनीय’ असावीत असे गृहीतक आहे.
ही धमकी गौतमी पाटीललाच का बरे..? सुषमा अंधारेंचा सवाल
गौतमी पाटील प्रकरणात मात्र अजूनच वेगळी गंमत आहे. तिला असलेले पाटील आडनावच काढून टाकायला सांगितले जात आहे. इथेही बाब उल्लेखनीय आहे की नृत्यांगना असणाऱ्या माधुरी दीक्षित यांना कधीही दीक्षित आडनाव काढण्याचे सल्ले कुणी दिले नाही किंवा ममता कुलकर्णी यांनाही कुलकर्णी आडनाव काढून टाकण्याचे सल्ले दिले नाही. (Gautami Patil News) अगदी माधुरी पवारला सुद्धा पवार आडनाव काढण्याचे सल्ले दिले गेले नाही मग हा सल्ला किंवा ही धमकी गौतमी पाटीललाच का बरे..?
एखाद्या मुलीला, माय माऊलीला तिच्या उदरनिर्वाहासाठी एखादे असे काम करावे लागते की जे काम व्यवस्थेला घृणास्पद वाटते तर याचा अर्थ असा आहे की एक तर तुमची नजर दूषित आहे , ती सुद्धा तुमच्यासारखीच दोन हाताची दोन पायाची माणूस आहे पण तिचं माणूस पण स्वीकारणं तुम्हाला जड जातय किंवा तिला तिथपर्यंत पोहोचायला भाग पाडणारी त्याला जबाबदार तुमची अपयशी अर्थव्यवस्था आहे. (Gautami Patil News) आणि हे अपयश झाकण्यासाठी तुम्ही तुमच्या मनगटबळाच्या जोरावर अशी दडपशाही करता..
आधी गौतमी पाटीलच्या नृत्यशैलीवरून बरेच वाद निर्माण झाले होते. (Gautami Patil News) आता तिच्या आडनावावरुन वाद निर्माण झाला आहे. यात काही जण तिला नाव ठेवताना दिसत आहेत तर काही जण तिला समर्थन देत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :