बापू मुळीक
सासवड: पिंपळे (ता. पुरंदर) येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदी गौरी गोफणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पिंपळे येथील ग्रामपंचायतच्या उज्वला प्रवीण पोमण यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त पदासाठी नुकतीच निवडणूक घेण्यात आली.
यावेळी गौरी गोफणे यांचा एकमेव अर्ज प्राप्त आल्यामुळे, त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडळ अधिकारी बापूसो देवकर यांनी केली. यावेळी उपसरपंच शरद शिवरकर, सदस्य सारिका दाते, किरण खेनट, मीनाक्षी पोमण, विद्या खेनट, अमोल पोमण, ग्रामसेवक शरद बिनवडे, तलाठी ऋषिकेश खंडागळे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी एडवोकेट नितीन कुंजीर, समीर जाधव, उमेश गायकवाड, कुंडलिक जगताप, सागर करवंदे, विलास चव्हाण, गणपत शितकल, गंगाराम जाधव, विलास पोमण, प्रवीण पोमण, धनंजय चव्हाण, उज्वला पोमण, किरण खेनट, समीर खेगरे, सारिका दाते, संतोष काळे, मीनाक्षी पोमण, डॉ. सुभाष शिवतारे श्रीमंत भणगे आदी उपस्थित होते. सर्व ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली विविध शासकीय योजना व निधी आणून, पिंपळे ग्रामपंचायतच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढे सातत्याने कार्यरत राहणार असल्याची ग्वाही नूतन सरपंच गौरी गोफणे यांनी निवडीनंतर दिली.