Gas Connection : लोणावळा, (पुणे) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागासह गरीब कुटुंबातील महिलांना गॅस वापरता यावा यासाठी उज्वला गॅस योजना सुरू केली. याचा फायदा अनेक महिलांना झाला. मात्र, लोणावळ्यात एक धक्कादायक प्रकार घडला. गॅस कनेक्शन घ्यायला गेलेल्या एका महिलेला ती अंध असल्याचे कारण देत गॅस कनेक्शन नाकारण्यात आल्याचे समोर आले आहे. (Gas Connection)
संगिता महापुरे असे या अंध महिलेचे नाव आहे. महापुरे या बँकेमध्ये नोकरीला आहेत. या अंध महिलेची ठाण्यातून लोणावळ्यात बदली झाली. त्यामुळे त्यांनी लोणावळ्यात आल्यानंतर स्वयंपाकासाठी गॅस कनेक्शन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, गॅस एजन्सी मालकाकडून त्यांना नवे कनेक्शन देण्याऐवजी महिला अंध असल्याचे सांगत गॅस कनेक्शन देणे नाकारले. अंध असल्याने गॅस कनेक्शन देऊ शकत नाही, असं थेट गॅस एजन्सी मालकाकडून सांगण्यात आले. (Gas Connection)
गॅस एजन्सीने लेखीही दिले लिहून..
लोणावळ्यातील परमार गॅस एजन्सीत हा प्रकार घडला. यामध्ये संगिता महापुरे यांनी नवीन गॅस कनेक्शनची मागणी केली. मात्र, गॅस एजन्सीने त्यांना कनेक्शन नाकारले. अंध असल्याने कनेक्शन देऊ शकत नसल्याचे सांगत तसे लेखी लिहूनही दिले आहे. (Gas Connection)
कंपनीच्या नियमानुसार कनेक्शन नाकारलं : एजन्सी मालक..
याबाबत परमार गॅस एजन्सीचे मालक प्रकाश परमार यांनी सांगितले की, ‘आम्ही त्यांची अडवणूक केलेली नाही. कंपनीचे काही नियम आहेत, त्यानुसार आम्ही परवानगी नाकारली आहे. या महिला अंध आहेत, त्यामुळे भविष्यात काही दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार?, त्यामुळे कनेक्शन नाकारण्यात आले’. (Gas Connection)