पुणे : कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या सोशल मिडीया अकाऊंटवरून दहशत पसरवणारे रिल्स टकण्यात आले होते. त्यावर पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे. पुमे पोलिसांनी निलेश घायवळचे इन्स्टाग्राम अकाउंट पुणे पोलिसांकडून सस्पेंड केले आहे. त्याशिवाय, कुख्यात गुंड गजानन मारणे आणि निलेश घायवळ यांनी पोलिसठाण्यात बोलवत स्वतः कुठले ही व्हिडीओ टाकणार नसल्याचा जबाब दिला आहे.
निलेश घायवळ सह अनेक कुख्यात गुंडांचे अकाउंट सोशल मीडियावर पोलिसांना आढळून आले आहेत. त्यामुळे सकाळी व्हिडीओ टाकला संध्याकाळी अकाउंट गायब झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
पुण्यातील नामचीन गुंडांचे बहुधा त्यांच्या चिल्ल्या पिल्ल्या लोकांनी भाईंच्या नावे अनेक अकाउंट बनवले आहेत आणि याच अकाउंटवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची करडी नजर आहे. कुठल्या ही गुन्हेगारीचे उदात्तीकरण करत असल्याच्या पोस्ट किंवा व्हिडीओ दिसले तर ते अकाउंट तर सस्पेंड होईलच पण ते चालवणाऱ्या तरुणांवर कठोर कारवाई केली जाणार आहे, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. पुणे पोलिसांनी 2 दिवसात तब्बल 500 गुन्हेगारांना बोलवून तंबी दिली आहे. त्यात हातात कोयते दिसले तर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे.