पुणे: पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा 5 जानेवारी रोजी कोथरुडमधील सुतारदरा परिसरात मुन्ना उर्फ साहिल पोळेकर आणि साथीदारांनी गोळ्या झाडून खून केला होता. या गुन्ह्यातील आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली आहे. दरम्यान मोहोळ खून प्रकरणातील मुख्य सुत्रधार गणेश मारणे (याने वकिलांमार्फत अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने गणेश मारणेचा अर्ज फेटाळून लावला आहे.
कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणे याच्या शोधासाठी पुणे पोलीस गुन्हे शाखेने दहा पथके स्थापन केली आहेत. पोलिसांना त्याला पकडण्यात अद्याप यश आले नाही. दुसरीकडे मात्र गणेश मारणे याने पोलिसांना चकवा देत वकिलामार्फत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. वकिलांनी मारणेची बाजु मांडताना केलेला युक्तिवाद सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. मोहोळवर गोळ्या झाडणाऱ्यांनी घटनास्थळावर गणेश मारणेचे नाव घेतले होते, त्यामुळे हा गंभीर गुन्हा आहे, जामीन देता येणार नाही असे आदेशात स्पष्ट केले. या प्रकरणात सरकार पक्ष 3 फेब्रुवारी रोजी बाजू मांडणार आहे.