पुणे : जी.एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट पुणेच्या इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिलने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेलतर्फे आयोजित आय.आय.सी. ५.० रँकिंगमध्ये ३.५ स्टार रेटिंग मिळाले आहे. रँकिंगमध्ये भारतातील ७५१४ संस्थांनी सहभाग नोंदवला होता. यात जी.एच. रायसोनी कॉलेजला ४५४ वे स्थान मिळाले आणि ३.५ स्टार रेटिंग मिळाले आहे.
या यशाबाबत बोलताना, ‘जी.एच.आर.सी.ई.एम.’चे कॅम्पस डायरेक्टर डॉ. आर. डी. खराडकर म्हणाले की, “आमच्या वार्षिक कामगिरीसाठी इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिलकडून हे मानांकन मिळाल्याबद्दल आम्हाला आनंद होत आहे. आमच्या संस्थेमध्ये संशोधनात्मक आणि नाविन्यपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत. हे यश उच्च शिक्षणात नवकल्पना आणि उद्योजकता वाढवण्यात आघाडीवर राहण्याच्या आमच्या निर्धाराला चालना देईल.”
‘जी.एच.आर.सी.ई.एम.’ पुणे भविष्यात नावीन्य आणि उद्योजकता उत्कृष्टतेचा पाठपुरावा करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. जी.एच.आर.सी.ई.एम. इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. आर. डी. खराडकर, प्रा. सारिका खोपे, प्रा. सोनाली सोनवणे आणि प्रा. डॉ. जयश्री शिंदे तसेच डॉ. दीपिका आजलकर आणि डॉ. स्वप्नील महाजन यांनी या सेलसाठी विशेष कार्य केले.
रायसोनी ग्रुप ऑफ संस्थेचे अध्यक्ष सुनील रायसोनी, रायसोनी ग्रुप ऑफ संस्थेचे कार्यकारी संचालक श्रेयश रायसोनी यांनी आयआयसी इव्हेंट्स आणि उपक्रमांच्या यशात योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे अभिनंदन केले.