पुणे : नॅशनल अॅक्रेडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबने (एनएबीएल) जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट (जीएचआरसीईएम), पुणेच्या मटेरियल टेस्टिंग लॅबसाठी मान्यता दिली आहे. या टेस्टिंग लॅबद्वारे सिव्हिल कामासाठीच्या आवश्यक काँक्रीट, स्टील, विटा आणि पेव्हिंग ब्लॉक्ससह बांधकाम साहित्यावर अनेक प्रकारच्या चाचण्या करता येणार आहेत. यामुळे सिव्हिल कामाची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करता येणार आहे. लॅब ISO/IEC17025:2017 मानकांचे पालन करते तसेच या टेस्टिंग लॅबद्वारे देण्यात येणारी प्रमाणपत्रे भारत आणि महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या संरचनात्मक संस्थांसाठी वैध राहणार आहेत. काँक्रीट आणि स्टील स्ट्रक्चर्सच्या चाचणीसाठी बांधकाम उद्योगांकडून याची खूप मागणी आहे.
मटेरियल टेस्टिंग लॅबमधील चाचणी यंत्रांमध्ये युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन (डिजिटल), कॉम्प्रेसिव्ह टेस्टिंग मशीन आणि इतर संबंधित उच्च अचूकता यंत्रांचा समावेश आहे. या प्रगत मशीन्स रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट येथे चालवल्या जाणार्या चाचणी प्रक्रियेच्या अचूकतेमध्ये योगदान देतील.
रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट कॅम्पसचे संचालक डॉ. आर. डी. खराडकर म्हणाले की, एनएबीएल, ज्याला भारत सरकारने सर्वोच्च गुणवत्ता मंडळ म्हणून मान्यता दिली आहे, ते कठोर गुणवत्ता मानके पूर्ण करणाऱ्या संस्थांनाच मटेरियल टेस्टिंग लॅबची मान्यता देते. या मान्यतेमुळे पुणे आणि परिसरातील सिव्हिल बांधकामांवरील सर्व प्रकारच्या आवश्यक चाचण्या करता येणार आहेत. तसेच बांधकाम करणाऱ्या कंपन्या अथवा संस्थांना सर्वसमावेशक सल्ला आणि संशोधनासही हातभार लावणार आहेत. ‘एनएबीएल’ची मटेरियल टेस्टिंग लॅबसाठीची मान्यता बांधकाम क्षेत्रात क्रांती घडवेल.
डॉ. एस. जी. बन (तांत्रिक व्यवस्थापक) आणि डॉ. ए. जी. डहाके (गुणवत्ता व्यवस्थापक) यांच्यासह संपूर्ण स्थापत्य अभियांत्रिकी संघाने एन.ए.बी.एल.ला मान्यता मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घेतले.
रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे अध्यक्ष सुनील रायसोनी आणि रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे कार्यकारी संचालक श्रेयश रायसोनी यांनी एन.ए.बी.एल.ला मान्यता मिळवण्यासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे अभिनंदन केले.