Wednesday, April 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Fursungi : अतिक्रमण कारवाईदरम्यान फुरसुंगीमध्ये तुफान राडा! महापालिका पथकावर दगडफेक

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 18 April 2026, 12:30
Fursungi

photo- ai

Fursungi : पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण कारवाईदरम्यान फुरसुंगी परिसरात मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. भाजी विक्रेत्यांनी कारवाईला विरोध करत महापालिका पथकावर दगडफेक केल्याने सुरक्षा रक्षक जखमी झाले असून, वाहनांची तोडफोडही करण्यात आली. या प्रकरणी संबंधित आरोपींविरोधात फुरसुंगी पोलीस ठाण्यात 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शितल महेश डांगे, रेखा सुदेश रोकडे, शाहिन मियासाहेब शेख, उषा दादाराव गायकवाड व सोनु सुदेश रोकडे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अमोल हरिदास लावंड (वय 41) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमोल लावंड हे पुणे महानगरपालिकेत सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक म्हणून कार्यरत असून, कोंढवा-ऊंड्री क्षेत्रीय कार्यालयात गेल्या तीन महिन्यांपासून सेवा बजावत आहेत.

16 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे 4 वाजता ते आपल्या पथकासह अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईसाठी रवाना झाले होते. या पथकात सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक गंगाधर माने, कर्मचारी किसन गवळी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुरक्षा रक्षक तसेच ठेकेदारांचे कर्मचारी यांचा समावेश होता. पथकाने ऊंड्री चौक परिसरात कारवाई केल्यानंतर सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास डी-मार्टसमोरील हांडेवाडी चौक येथे कारवाई सुरू केली.

यावेळी रस्त्यावर अतिक्रमण करून बसलेल्या भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्या ताब्यातील वजनकाटे व भाजीपाल्याच्या कॅरेट जप्त करून ट्रकमध्ये भरले जात असताना, अचानक 3 ते 4 महिला आणि 2 पुरुषांनी कारवाईला तीव्र विरोध केला. सदर व्यक्तींनी महापालिका पथकाला अडवत ट्रक पुढे जाऊ दिला नाही. यावेळी एका इसमाने 17 सिटर बसच्या काचांवर बुक्क्यांनी प्रहार केला, तर दुसऱ्या इसमाने दगडफेक करत वाहनाची काच फोडली. याच दगडफेकीत महाराष्ट्र सुरक्षा बलाचे रक्षक अंबादास पोमण आणि सचिन पुंदे जखमी झाले.

दरम्यान, या घटनेमुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला. पथकाने तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यानंतर फुरसुंगी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही महिलांना ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांनी आपली नावे शीतल डांगे, रेखा रोकडे, शाहीन शेख आणि उषा गायकवाड अशी सांगितली. तसेच दगडफेक करणाऱ्या सोनू रोकडे याचे नाव समोर आले असून, आणखी एक अज्ञात इसमही या प्रकारात सहभागी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

फिर्यादी लावंड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित आरोपींनी सरकारी कामात अडथळा आणत “तुम्हाला येथून जाऊ देणार नाही, तुमचा राजीनामा घेऊ,” अशा धमक्या दिल्या. तसेच महिलांवर धक्काबुक्की केल्याचा खोटा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची धमकीही दिली. या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 121(1), 132, 221, 3(5), 324(4), 351(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Khashaba Jadhav : खाशाबा जाधवांना ‘पद्मविभूषण’ देण्याबाबत निर्णय घ्या ; उच्च न्यायालयाचा केंद्राला आदेश..

Tuesday, 21 April 2026, 19:12

Pune fraud : “एमबीबीएस प्रवेशाचे आमिष; जुळ्या मुलींच्या नावाखाली 5 लाखांची फसवणूक!” एड्युव्हिओ कंपनीविरुद्ध गुन्हा

Tuesday, 21 April 2026, 19:07

Pune News : कमी उंचीमुळे पोलीस भरती हुकली, पण समाजात मिरवण्यासाठी रचला खोटा बनाव ; नऱ्हे पोलिसांनी तरुणाला ठोकल्या बेड्या

Tuesday, 21 April 2026, 18:46

Lenskart : “लेन्सकार्टच्या ‘ग्रुमिंग गाईड’वरून वाद पेटला!” टिळा-टिकलीवरील कथित निर्बंधांवर मनसे आक्रमक; हवेली तालुक्यात तीव्र निषेध

Tuesday, 21 April 2026, 18:26

सुप्रिया सुळेंचे सुनेत्रा पवारांसाठी मतदानाचे आवाहन ; अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्याची साद, शारदा’ प्रांगणातील सांगता सभेत सुळे भावूक

Tuesday, 21 April 2026, 18:10
Government Employee Strike for old pension scheme on 19 november

राज्यातील 17 लाख कर्मचारी आजपासून संपावर ; जुनी पेन्शन आणि रिक्त पदे भरण्यासह 18 प्रमुख मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही…

Tuesday, 21 April 2026, 17:47
Next Post

पाण्याच्या टाकीत आढळलं मृत माकड, चार दिवस गावकऱ्यांना दूषित पाणीपुरवठा; ग्रामपंचायतीवर संताप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.