दीपक खिलारे
Funding Approved | इंदापूर : इंदापूर शहरासाठी भाजप शिवसेना युती सरकारने नगर विकास विभागाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी विकास कार्यक्रमांतर्गत ३ कोटीचा निधी मंजूर केला आहे. अशी माहिती माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकारांना दिली.
इंदापूर शहरामध्ये आपण सत्तेवर असताना नियोजनबद्ध पद्धतीने विकासकामे केल्याने शहराचा सर्वांगीण विकास झाला आहे. आगामी काळातील शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू दिली जाणार नाही, असे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सदर निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे हर्षवर्धन पाटील यांनी आभार व्यक्त केले.
मंजूर कामे पुढीलप्रमाणे (कंसात मंजूर निधी)
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर मध्ये समाज मंदिराचा दुसरा मजला बांधकाम करणे ( रु. ९१ लाख ३४,८००),
२) अविनाश मखरे घर ते गायकवाड घर ते पुणे-सोलापूर हायवे रस्ता बंदिस्त ड्रेनेज ओढयापर्यंत करणे (रु. ४१ लाख ३१,५८५),
३) प्रभाग क्र.१ डॉ. आंबेडकर वसाहत विलास मखरे घर ते रामचंद्र मखरे घर पाथ वे करणे (रु. ११ लाख ८३,७९६),
४) डॉ. आंबेडकरनगर व साठेनगर मधील स्मशानभूमी सुशोभीकरण करणे,(रु. ४७ लाख ६९,२४२),
५) ज्योतिबा माळ स्मशानभूमी ते हनुमंत कांबळे घर ते विलास मखरे घर ते शिवाजी मखरे घरापर्यंत अंडरग्राउंड ड्रेनेज करणे (रु. १ कोटी ७ लाख ७९,४७८)
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Pune News : वारजेतील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल