जुन्नर : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातील पुणे विभागातील जुन्नर बसस्थानकाची पुनर्बाधणी करणे, या कामासाठी ९ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची पुणे म्हाडाचे अध्यक्ष तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
आढळराव पाटील यांच्या गेल्या दोन वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून मुख्यमंत्री व परिवहन मंत्री एकनाथ शिंदे यांनी जुन्नर शहर हे तालुक्यातील प्रमुख शहर असून या शहरातील बसस्थानकाची झालेली दुरावस्था पाहून आढळराव यांनी या बसस्थानकाची पुनर्बाधणी करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रव्यवहार करून व त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन कामाचे महत्त्व पटवून दिले. त्यानुसार महायुती शासनाच्या माध्यमातून या कामाला गृह विभागाने मंजुरी देत ९ कोटी ५० लक्ष निधी मंजूर केला आहे. यामध्ये प्रामुख्याने तळमजला व पहिल्या मजल्याचे बांधकामात फलाट, वाहतूक नियंत्रण कक्ष, आरक्षण, पास सेक्शन, पार्सल ऑफीस, चालक, वाहक विश्रांतीगृह, महिला विश्रांतीगृह, हिरकणी कक्ष, प्रसाधनगृह आदी विकासात्मक कामाचा समावेश आहे. त्याचबरोबर पाणीपुरवठा व सांडपाणी, काँक्रीट वाहनतळ, विद्युत विषयक कामे, रेन वॉटर हार्वेस्टिंग, फायर फायटिंग, संरक्षक भित अशा विविध कामांचा समावेश आहे.