पुणे : पिंपरी- चिंचवड परिसरातील सराईत गुन्हेगारांविरूध्द पथकाने कारवाई केली होती. तळेगाव गोळीबार प्रकरणातील आरोपी फरार झाले होते. मात्र, फरार आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी तुषार उर्फ गोल्या रामराव राठोड आणि विकी खराडे तसेच पांडुरंग उर्फ पांडा बालाजी कांबळे यांना अटक करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंडाविरोधी पथकाने केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत ४ पिस्तूल आणि १२ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. तळेगाव दाभाडे परिसरात गोळीबार प्रकरणातील फरार झालेल्या दोघांना नवी मुंबई येथून अटक करण्यात आले आहे. तुषार उर्फ गोल्या असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला चाकणमधून अटक करण्यात आले आहे.
दुसऱ्या कारवाईमध्ये सांगवी परिसरात अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना बेड्या ठोकलया आहेत. दोन्ही कारवाईत एकूण चार पिस्तूल आणि बारा जिवंत काडतुसे जप्त केली. सांगवी मधून अवैधरित्या शस्त्र बाळगल्या प्रकरणी रोहित दर्गेश धर्माधिकारी आणि अनिकेत सतीश काजवे याला बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.