उरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील कस्तुरी प्रतिष्ठानच्या वतीने दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मेमाणे यांनी दिली.
सामुदायिक विवाह सोहळ्याचे यंदाचे अठरावे वर्ष आहे. उरुळी कांचन येथील कस्तुरी मंगल कार्यालयात मंगळवारी २६ डिसेंबर रोजी हा सोहळा रंगणार आहे. या मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा व खर्च वाचवावा, असे आवाहन मेमाणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या विवाह सोहळ्यातील वधुवरांना लग्नाचा पोशाख, जीवनावश्यक वस्तू, संसारोपयोगी भांडी, बूट, चप्पल तसेच सर्वांची भोजनाची व्यवस्था प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येणार आहे. या विवाह सोहळ्यात सर्वधर्मियांचा सहभाग आहे.
दरम्यान, या विवाह सोहळ्यात भव्य मिरवणुकीचेही आयोजन करण्यात आले आहे. विवाह नोंदणी करण्यासाठी मुलगा व मुलगी या दोघांचे दाखले घेऊन उरुळी कांचन येथील कार्यालयात संपर्क साधावा. गरजू, गरीब, मुला-मुलींच्या पालकांनी स्वतः नावनोंदणी करावी, असे आवाहन मेमाणे यांच्यावतीने करण्यात आले आहे.