(Fraud News) पुणे : रुग्णावाहिकेमध्ये डीझेल न भरता चालकाने पेट्रोल पंपावरून परस्पर तब्बल १ लाख १६ हजार रुपये घेऊन भारती हॉस्पिटलची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चालकावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १ एप्रिल २०२२ ते २ जानेवारी २०२३ यादरम्यान घडला.
समीर प्रकाश साळवी (रा. प्रियदर्शनी अपार्टमेंट, बालाजीनगर, धनकवडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी प्रविण रघुनाथ जाधव (वय ४५, रा. आंबेगाव पठार) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती हॉस्पिटलमधील रुग्णावाहिकांमध्ये डिझेल भरण्यासाठी पेट्रो कार्डचा वापर केला जातो. पेशंटला ने आण करण्यासाठी रुग्णवाहिका व इतर वाहनांना वेळोवेळी डिझेल व पेट्रोल भरण्यासाठी ते भारत पेट्रोलियमचे पेट्रो कार्ड वापरत असतात. पंपावर इंधन भरल्यानंतर त्यांचे बिल अदा केले जाते. ही ६ पेट्रो कार्ड कार्यालयात ठेवली जातात. इंधन भरण्यासाठी जाणारे चालक हे कार्ड घेऊन जातात व पेट्रोल, डिझेल भरुन झाल्यावर कार्ड पुन्हा आणून ठेवतात.
दरम्यान, ट्रान्सपोर्ट विभाग प्रमुख जयंत भेडसगावकर यांना २ जानेवारीला एक कार्ड जागेवर आढळून आले नाही. ते कार्ड समीर साळवी याच्याकडे होते. आरोपी समीर साळवी याने रुग्णवाहिकेत डिझेल न भरता पेट्रो कार्डवर मात्र डिझेल भरल्याची नोंद केली. आणि देशमुख पेट्रोल पंपावरुन कॅश पैसे घेऊन तब्बल १ लाख १६ हजार रुपयांची भारती हॉस्पिटलची फसवणूक केली आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक घावटे करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Chandrakant Patil : चंद्रकांत पाटीलांची क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी