Fraud News | पुणे : प्रसिद्ध इन्शुरन्स कंपनीतील दलालाने आटी व शर्तींचा भंगकरून चारचाकी व तीनचाकी वाहने असताना त्याठिकाणी ही दुचाकी वाहने असल्याचे दाखवून त्याप्रमाणात प्रिमीयमची रक्कम घेऊन तसेच ती रक्कम कंपनीत जमा न करता शासनाची व कंपनीची फसवणूक (Fraud News) केल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी लक्ष्मण काशिनाथ रेड्डी (रा. आळंदी रोड) व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतअभिजीत मोरे (वय ४०) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. २०१८ ते २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,तक्रारदार यांची नामांकित इन्शुरन्स कंपनी आहे. त्यांच्याकडून वाहनांचे इन्शुरन्स काढले जातात. त्यांनी इन्शुरन्स काढण्यासाठी दलाल म्हणून लक्ष्मण रेड्डी याची नेमणूक केली होती. त्यावेळी त्यांच्यात काही अटी व शर्तीवर करारनामा झाला होता.
कंपनीची ४ लाख २० हजार आणि शासनाची ७६ हजार रुपयांची फसवणूक…
मात्र, लक्ष्मण याने या अटी व शर्तीचा भंगकरून वाहन चालकांशी संगणमतकरून चारचाकी व तीन चाकी वाहने असताना ती दुचाकी असल्याचे रेकॉर्डकरन त्यांच्याकडून त्या प्रमाणात प्रिमीयमची रक्कम घेऊन ती देखील कंपनीत जमा केली नाही. तसेच, कंपनीची ४ लाख २० हजार आणि शासनाची ७६ हजार रुपयांची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.