पुणे : शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांच्यावर रविवारी दुपारी प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यावेळी त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शिक्रापूर पोलीसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्रापूर येथे आज रविवारी दुपारी माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांच्यावर अज्ञात तरुणाने धारदार शस्त्राने हल्ला केला. त्या हल्ल्यात त्यांच्या मानेवर आणि पाठीवर गंभीर स्वरुपाने वार करण्यात आले. त्यावेळी गिलबिले हे गंभीर जखमी झाले होते. त्यावेळी त्यांना पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले होते मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी या परिसरात बंदोबस्त लावला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. तर आरोपीच्या शोधासाठी पथके पाठवले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.