Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जबरदस्तीने सोन्याचे गंठण हिसकावले नंतर जीवे मारण्याची धमकी दिली; तब्बल 10 महिन्यानंतर राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Renuka Pawarby Renuka Pawar
Wednesday, 1 October 2025, 16:19

विशाल शिंदे

नसरापूर : नसरापूर येथील वनश्री सोमनाथ उकिरडे या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी धनंजय दशरथ दसवडकर (रा. आस्कवडी, ता. राजगड) यांच्याविरुद्ध राजगड पोलिस ठाण्यात तब्बल दहा महिन्यांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

फिर्यादीच्या सासऱ्यांचे, मधुकर रामचंद्र उकिरडे यांचे कापूरव्होळ (ता. भोर) येथे दुकान गाळे आहेत. त्यापैकी दोन गाळे धनंजय दसवडकर यांना भाड्याने देण्यात आले होते. भाड्याची थकबाकी फेडण्यासाठी दसवडकर यांनी मधुकर उकिरडे यांना कोरे धनादेश दिले होते. हे धनादेश परत मिळावेत या कारणासाठी दसवडकर यांनी 7 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री नऊच्या सुमारास उकिरडे यांच्या घरी भेट दिली. मात्र, त्या वेळी मधुकर उकिरडे घरी नसल्याने त्यांचा मुलगा सोमनाथ आणि सुन वनश्री उकिरडे यांना त्यांनी चेक परत देण्याची मागणी केली.

उकिरडे दांपत्याने सांगितले की दुकानाचा व चेकसंबंधीचा व्यवहार सासऱ्यांशी संबंधित आहे. मात्र, दसवडकर यांनी दबाव आणून “मी चेक घेतल्याशिवाय जाणार नाही, नाहीतर गळ्यातील सोन्याचे गंठण द्या,” अशी धमकी दिली. यावर विरोध होताच दसवडकर यांनी महिलेच्या गळ्यातील 53 ग्रॅम वजनाचे, अंदाजे 1 लाख 17 हजार 612रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण हिसकावले. आणि “माझे चेक मिळाल्याशिवाय हे गंठण परत करणार नाही. व पोलिसांत तक्रार दिल्यास तुम्हा दोघांना जीवे मारीन,” अशी धमकी दिली.

 

ही घटना 11 नोव्हेंबर 2024 रोजी घडली. मात्र, भीतीमुळे पीडित दांपत्याने 31 जानेवारी 2025 रोजी पोस्टाद्वारे राजगड पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज पाठवला. परंतु त्याची दखल न घेतल्याने पीडितांनी 10 जुलै रोजी पोलिस अधिक्षक, मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच महिला आयोग यांच्याकडे तक्रार केली. अखेर दबाव आल्यानंतर 2 ऑगस्ट 2025 रोजी राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

फिर्यादीचे पती सोमनाथ उकिरडे यांनी आरोप केला की, “गुन्हा दाखल होऊनही आरोपीवर अद्याप कारवाई झालेली नाही.”

या संदर्भात तपास अधिकारी पोलिस हवालदार अजित माने (राजगड पोलिस ठाणे) यांनी सांगितले की, “सदर प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला असून, तपासाआधी कागदपत्रे व पुरावे सरकारी अभियोक्ता, शिवाजीनगर, पुणे यांच्याकडे अभिप्रायासाठी पाठवले आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.”

दरम्यान, ही घटना उघड झाल्यानंतर नसरापूर व राजगड परिसरात मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आले असून, पीडित दांपत्याला न्याय कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

मराठ्याचं भगव वादळ मुबंईत धडकण्याआधीच ठिणगी! जरांगेंच्या घोषणेनंतर तासाभरातच फुट,मुंबईच्या वाटेत काटे

Saturday, 12 September 2026, 17:50

प्रथमेशची आत्महत्या अन् गावात मृत्यूचं सत्र! 10 दिवसांत 3 शेतकऱ्यांचा मृत्यू, कर्जाचा विळखा कायम

Saturday, 12 September 2026, 17:26

प्रतीक्षा संपली! अखेर ‘माधुरी’ नांदणीच्या मठात दाखल,आगमन होताच हजारो कोल्हापूरकरांचा जल्लोष

Saturday, 12 September 2026, 16:43

भ्रष्टाचाराला अभय? ’आलेगाव पागाच्या तीनही शेतकरी सोसायट्यांच्या कारभारावर गंभीर आरोप; ‘तक्रारी, त्रुटी उघड होऊनही कारवाई नाही’

Saturday, 12 September 2026, 16:03

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गणेशोत्सवात 3 दिवस ‘या’ मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Saturday, 12 September 2026, 15:42

नांदूर येथील गिट्स कंपनीतून तांब्याची केबल चोरणारा चोरटा यवत पोलिसांच्या जाळ्यात; 1 लाखाचा मुद्देमाल जप्त

Saturday, 12 September 2026, 15:17
Next Post

शिरूरमध्ये आता 'स्मार्ट वॉच'! बिबट्यांच्या हालचालींनावर लक्ष ठेवण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp