पुणे : दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पती पत्नीला रोज रात्री मोबाईलमध्ये अश्लिल पिक्चर दाखवायचा आणि अश्लिल पिक्चरमध्ये जे करतात, त्याप्रमाणे करायला भाग पाडत होता. न केल्यास शारीरीक त्रास देऊन मारहाण करायचा एवढेच नव्हे तर जिवे मारण्याची धमकी द्यायचा. दिर, जाऊ, नणंद मारहाण करून शारीरिक छळ करायचे, अशी तक्रार एका विवाहित महिलेने दौंड पोलीस ठाण्जत केल्याने पतीसह सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती दौंड पोलिसांनी दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशांक भोसले, प्रशांत भोसले, प्रियंका भोसले, निलम कांबळे (रा. पुणे), सिमा कांबळे (रा. पुणे), कविता कांबळे (रा. पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०१० ते १५ मे २०२२ या दरम्यान घडला.
पिडीत महिलेचा विवाह २ मे २०१० रोजी झाला होता. पती सतत दारूच्या नशेत असल्याने ते काही कामधंदा करीत नव्हते. तसेच मटका खेळण्याची सवय असल्यामुळे ते सतत पिडीतेच्या आई-वडिलांकडून पैसे आणण्याचा तगादा लावत, तिला मारहाण करत होते. या सर्व प्रकारामुळे महिला मानसिक दृष्ट्या खचत होती.
पती दारूच्या नशेत रात्री-अपरात्री घराबाहेर हाकलून देत होता. मुलबाळ होत नसल्यामुळे पती, जाऊ व नणंदा मारहाण करून मानसिक त्रास देत होते, तर पती रात्री घरी येऊन मोबाईलमध्ये अश्लिल पिक्चर दाखवायचा व अश्लिल पिक्चरमध्ये जसे करतात, त्याप्रमाणे करायला भाग पाडायचा. याचा मानसिक त्रास महिलेला असह्य झाला होता.
पती अश्लिल पिक्चरमध्ये दाखविल्यासारखे न केल्यास पिडीतेला शारीरिक त्रास देऊन मारहाण करायचा व तसे न केल्यास जिवे मारण्याची धमकी देत होता, अशी तक्रार पिडीत महिलेने दौंड पोलीस ठाण्यात दिली आहे.
महिलेच्या तक्रारीनंतर दौंड पोलिसांनी या प्रकरणी गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेचा अधिक तपास दौंड पोलीस करीत आहेत.