पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोंढवा परिसरात रहाणाऱ्या १६ वर्षीय मुलीला तिच्या ओळखीतील एका २३ वर्षीय तरुणाने ती अल्पवयीन असल्याचे माहिती असताना देखील, तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. इतकंच नाही तर तरुणी त्याला भेटायला न गेल्यास तिच्या नकळत काढलेले नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.
या त्रासाला कंटाळून पिडित मुलीने आरोपीच्या विरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी आरोपी तरुणावर बलात्कार व पोक्सो कायद्यनुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी कोंढवा परिसरात राहण्यास आहे. आरोपीने पिडित मुलीला ‘तु मला खूप आवडते, मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे’ असे बोलून तिला लग्न करण्याचे अमिष दाखवले. त्यानंतर वेळोवेळी जबरस्तीने तिच्यासोबत शारिरिक संबंध ठेवले. तसेच तरुणी त्याला भेटायला न गेल्यास तिच्या नकळत काढलेले नग्न फोटो सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कोंढवा पोलिस करत आहेत.
प्रेमाचा बहाणा करुन बलात्कार : हडपसर परिसरातील घटना
दुसऱ्या घटनेत हडपसर परिसरात एका २३ वर्षीय तरुणाने १९ वर्षाची तरुणी ही अल्पवयीन असल्यापासून तिच्यासोबत प्रेमाचा बहाणा करुन जबरदस्तीने शारिरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे ती नऊ महिन्याची गर्भवती राहिल्याने आरोपीवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.