पुणे : पुणे- नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आमदार सुनील टिंगरे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. हा मार्ग सिग्रल फ्री करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली होती. याबाबत मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात ही बैठक घेण्याचे आश्वासन देखील दिले होते. त्यानुसार शनिवार पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
या बैठकीत नगर रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून शिरूर ते वाघोलीपर्यंत दुमजली उद्वाणपूल प्रस्तावित असून तो रामवाडीपर्यंत आणला जाईल. तसेच शालीनगर चौकात महापालिकेच्या माध्यमातून उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार सुनील टिंगरे, आयुक विक्रम कुमार, पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, एनएचआयचे वरिष्ठ अधिकारी अभिजित आवटे, वाहतूक पोलीस सहआयुक्त संखे उपस्थित होते.
दरम्यान, या उड्डाणपुलाचा सविस्तर प्रकल्प आराखडा सादर करावा, अशा सूचना अजित पवार यांनी यावेळी केल्या आहेत. तसेच शालीनगर चौकात महापालिकेच्या माध्यमातून उड्डाणपूल आणि प्रेड सेपरेटरसंबंधी निविदा प्रक्रिया तातडीने राबविण्यात यावी, असे आदेश अजित पवार यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत. धानोरो, संतनगर, फाइव्ह नाइन चौक ते धानोरी, विश्रांतवाडी येथील पर्यायी रस्ते मार्गी लावण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांनी जागेवर जाऊन पाहणी करावी. त्यासंदर्भात कार्यवाही करावी अशा सूचनाही अजित पवार यांनी या बैठकीत केल्या आहेत.