पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी देवगडमधील केशर हापूसच्या पहिल्या पेटीला तब्बल ३१ हजार रुपये भाव मिळाला. मार्केट यार्डातील व्यापारी अनिरुद्ध ऊर्फ बापू भोसले यांच्या गाळ्यावर ही पेटी दाखल झाली. देवगड येथील शेतकरी साद मुल्ला यांच्या बागेतून ही आवक आली आहे. सव्वा पाच डझनाची ही पेटी व्यापारी रावसाहेब कुंजीर यांनी खरेदी केली.
साई आंबा सर्व्हिसचे प्रणित मांजरेकर यांनी ही पेटी पुण्यात आणली. याप्रसंगी भाजपचे नेते बाबा मिसाळ, फळे व भाजीपाला विभागप्रमुख बाळासाहेब कोंडे, व्यापारी गौरव घुले, अंकुश वाडकर, युवराज कांची, राजू पतंगे, राजू भोले, अरुण वीर, रोहन जाधव, किशोर लडकत, संजय वखारे, प्रकाश पंजाबी, शरद कुंजीर, बलभीम माजलगावे उपस्थित होते. येत्या १५ मार्चपासून आवक नियमित सुरू होईल, असा अंदाज आहे. आंब्याचा दर्जा चांगला राहील, मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादन १० ते २० टक्क्यांनी कमी राहील, असा अंदाज आहे.