पुणे : पहिल्या दलित स्त्री लेखिका तसेच ज्येष्ठ आंबेडकरवादी साहित्यिक शांताबाई कांबळे यांचे वृद्धापकाळाने दिनांक २५ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ७ वा पुण्यात निधन झाले. त्या १०२ वर्षाच्या होत्या.
त्या शेवटच्या काळात पुण्यात आपल्या मुलीकडे राहत होत्या. त्यांच्यावर शेवटचे संस्कार कोपरखैरणे येथे बौद्ध धर्माच्या पद्धतींने होतील. दलित पँथरचे अध्यक्ष दिवंगत प्रा. अरुण कांबळे यांच्या त्या मातोश्री होत्या.
शांताबाई कांबळे ह्या दलित स्त्री लेखिका, शिक्षिका व सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यात महुद बुद्रुक या गावी झाला. ‘माज्या जल्माची चित्तरकथा’ या पुस्तकावर आधारीत नाजुका या नावाने एक दूरचित्रवाणी मालिका होती.
शांताबाई कांबळे यांचा अनेक पुरस्काराने सन्मान झाला आहे, त्यांत दलितमित्र हा एक सन्मान आहे. त्यांच्या पुस्तकाचे अनेक भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय भाषेत भाषांतर झाले आहे.