पुणे: गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. गोळीबाराची घडली घटना घडली नाही, असा आठवडा जात नाही. आरोपींना पुणे पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही? असा प्रश्न नागिरक उपस्थित करू लागले आहेत. आता जिल्ह्यातील सासवडमध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. भर दिवसा झालेल्या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुरंदर तालुक्यातील सासवड येथे एक गोळीबाराची घटना घडली. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. राहुल नामदेव टिळेकर (वय -४१) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हा प्रकार सासवड येथील बस स्थानका समोर घडला असून तीन हल्लेखोरांनी हा हल्ला केला.
राहुल टिळेकर यांना पुणे येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सासवड एसटी बस स्थानकासमोर टिळेकर हे आईस्क्रीम विक्रीचा व्यवसाय करतात, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. गुरुवारी (१८ जुलै ) दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. गोळीबार झाल्यानंतर सासवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या संदर्भातील अधिकचा तपास त्यांनी सुरु केला आहे.
दरम्यान, राहुल टिळेकर यांच्यावर तीन हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. यानंतर तिथून ते पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. हा गोळीबार कोणत्या कारणावरून झाला? हल्लेखार कोण आहेत? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.