पुणे : शहरात किरकोळ कारणावरून गंभीर गुन्हे घडण्याचे प्रमाण वाढत आहे. आपल्या जवळच्या मैत्रिणीला आपल्या विरोधात भडकवल्याचा राग अनावर झाल्याने एका माथेपीरूने इंन्स्टाग्रामवर फेक अकाउंट तयार केले. त्यामध्ये मुलीचे फोटो व व्हिडिओ व्हायरल केले. एवढ्यावरच न थांबता मुलीला फोन करुन अश्लील शिवीगाळ करून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीला आला आहे. या प्रकरणी चतृ:श्रृंगी पोलिसांनी मध्य प्रदेशातील एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार डिसेंबर २०२२ ते १५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत सोशल मीडिया व मुलीच्या फोनवरुन घडला आहे. याबाबत जनवाडी, गोखलेनगर येथे राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीने शनिवारी (ता. १७) चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन शिवम पांडे (वय २२, रा. मनगवा, आलमगंज, मध्य प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी मैत्रिणीसोबत गोखले नगर परिसरातील एका सोसायटीत राहते. तिच्या मैत्रिणीचा मित्र आरोपी शिवम पांडे याने तुच माझ्याबद्दल निशिला शिकवलेस असे म्हणून फोनवर व सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठलाग केला.
आरोपीने फिर्यादी तरुणीला धडा शिकवण्यासाठी अश्लील शिवीगाळ केली. फिर्यादी यांच्या इन्स्टाग्राम आयडीवरुन तिने पोस्ट केलेले फोटो व व्हिडिओ आरोपीने घतले. त्यानंतर आरोपीने त्याच्या नावाने इंन्स्टाग्रामवर फेक अकाउंट तयार केले. फिर्यादी यांचे मित्रासोबत असलेले फोटो व व्हिडिओ फेक अकाउंटवर अपलोड करुन मुलीला व तिच्या मैत्र मैत्रिणींना टॅग केले. फिर्यादी यांना व्हॉट्सअॅपवर अश्लील मेसेज करुन फिर्यादी यांच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.
या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे नांद्रे करीत आहेत.