पुणे : विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार करणाऱ्या तरुणावर रविवारी (दि. ११) चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यासंदर्भात तांत्रिक तपासाच्या माध्यमातून पोलिसांनी तपास जारी केला आहे. यासंदर्भात एका महिलेने फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार, सुजितसिंह शिवराजसिंह जाधवराव (वय २५, रा. सकाळनगर, बाणेर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.
जाधवराव आणि पीडित महिलेची गेल्या वर्षी ओळख झाली होती. त्याने महिलेला विवाहाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केले. तिने विवाहाबाबत विचारणा केल्यावर तेव्हा त्याने टाळाटाळ सुरू केली. त्यामुळे या महिलेने अखेर पोलिसांकडे तक्रार दिली.