बारामती : बारामती लोकसभा निवडणुकीत बारामतीत पैसे वाटल्याच्या चित्रफिती एक्सवर प्रसारित झाला होत्या, त्या अनुषंगाने बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे यांच्या सूचनेवरून पंचायत समितीचे कर्मचारी केशव तुकाराम जोरी यांनी शहर पोलीस ठाण्यात चित्रफितीमधील अनोळखी व्यक्तीविरोधात पैसे वाटप केल्याच्या कारणावरून फिर्याद दिली.
बारामती येथील साठेनगरमधील अंगणवाडी परिसरात लोकसभा निवडणूक प्रक्रियेदरम्यान पैसे वाटप केल्याची चित्रफिती ट्विटरवर प्रसारित केली होती. त्या अनुषंगाने तहसीलदार यांच्या सूचनेवरून शहर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत आमदार रोहित पवार यांनी ट्विट करीत तुमच्या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांसोबत तुमच्या पदाधिकाऱ्याच्या नातलगाने पैसे वाटल्याची आणखी एक चित्रफित, तर आता चित्रफितीत जो माणूस दिसतोय तो तुमच्या ओळखीचा किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचा नातलग नाही, असे म्हणू नका आणि इतर लोकं तुमच्या कंपनीचे कर्मचारी नाहीत, असेही म्हणू नका, अशी टिपणी करीत महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना टॅग केली आहे.