शिक्रापूर (पुणे) : रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे नोकरीच्या निमित्ताने राहणाऱ्या युवतीला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार करून बदनामीची धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना घडली. याबाबत पीडित युवतीने रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी संकेत रामदास महाले (रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नोकरीच्या निमित्ताने राहणाऱ्या युवतीची ओळख संकेत महाले याच्या सोबत झाल्यानंतर संकेत याने युवतीला लग्नाचे आमिष दाखवत युवतीवर अत्याचार केला. त्यांनतर युवतीला घडलेला प्रकार तिच्या ओळखीच्या लोकांना सांगण्याची धमकी देऊन तिला जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी केली.