माळेगाव : माळेगाव येथील ढगाईनगर येथे अवैध मटका धंद्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने धाड टाकून दोन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ८९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बाळू बाबुलाल आत्तार (रा. ढगाईनगर, माळेगाव बु. ता. बारामती), अमोल किसन मदने (रा. नीरावागज, ता. बारामती) यांच्या विरोधात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय बारामती येथील पोलीस कॉन्स्टेबल सुनील ढगाटे यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपी बाळू आत्तार हा ढगाईनगर माळेगाव येथील राहत्या घराच्या आडोशाला मटका जुगार खेळताना आढळून आला. तो हा मटका अमोल मदने याकडे देत होता, असे फिर्यादीत म्हटले आहे. सदर गुन्ह्याचा तपास हवालदार सादिक सय्यद करत आहेत.