पिंपरी: महिलेच्या परस्पर तिच्या बँक खात्यातून 5 लाख रुपये लंपास करण्यात आले आहेत. हा सर्व प्रकार मंगळवारी 28 नोव्हेंबर रोजी रहाटणी येथे घडला आहे. या प्रकरणी महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. SHUKAR MIRDHA या नावाच्या खाते क्रमांकावर व त्यानंतर पुढे ट्रान्सफर केलेल्या बँक खाते धारकावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बँक खात्यातून आरोपीने परस्पर बँक खाते हॅक करत खात्यातून 5 लाख रुपये काढून घेतले. याबाबत माहिती मिळताच महिलेने वाकड पोलीस ठाण्यात बुधवारी फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.