चाकण : सोबत काम करणाऱ्या मुलीचे अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्या सुपरवायझरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निघोजे (ता. खेड ) येथे ही घटना २०२३ ते २६ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत घडली. कृष्णा राठोड (वय ३२ वर्षे, रा. निघोजे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत एका ५५ वर्षीय व्यक्तीने महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांची मुलगी एका कंपनीत कामाला होती. तिथे आरोपी राठोड हा सुपरवायझर होता. त्यावेळी आरोपी राठोड याने पिडित मुलीची ओळख करून तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढले. तू माझ्याशी लग्न कर नाही तर तुझे फोटो नातेवाईकांना पाठवेल, अशी धमकी दिली. मात्र मुलीने आरोपीच्या प्रस्तावास नकार दिल्याने तिचे फोटो भाच्याला पाठवून मुलीची बदनामी करीत तिचा विनयभंगही केला. महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.