पुणे: अंगावरील सर्व कपडे काढून महिलेकडे पाहत अश्लील हावभाव करुन विनयभंग केल्याची घटना शहरातील येरवडा परिसरात घडली आहे. हा प्रकार सोमवार एक एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास येरवड्यातील यशवंत नगर येथे घडला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका महिलेने मंगळवार दोन एप्रिल रोजी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार धनराज महेश थोरात (वय-26 रा. यशवंत नगर, येरवडा) याच्यावर भादंवि कलम 354, 354 (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि त्यांची नणंद या दोघी घराच्या दारात गप्पा मारत होत्या. त्यावेळी आरोपी धनराज थोरात सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिलेच्या घरासमोर आला. त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ करत स्वत:च्या अंगावरील सर्व कपडे काढले. त्यानंतर महिलेकडे पाहून अश्लील हावभाव करत महिलेच्या स्त्री मनास लज्जा उत्पन होईल असे कृत्य केले. तसेच सदर आरोपीने यापूर्वी देखील महिलेचा पाठलाग करुन विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेळके हे करीत आहेत.