पुणे : सोशल मीडियावरील ओळखीतून लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार करणाऱ्यावर सिंहगड रस्ता पोलिसांनी सोमवारी (दि. २९) गुन्हा दाखल केला. तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने पोलिसांनी तपास जारी केला आहे. प्रसाद रमेश पोकळे (रा. अजिंक्य मित्र मंडळाजवळ, अंबाईदरा, धायरी) हे संशयित आरोपीचे नाव आहे. पीडित तरुणी आणि आरोपी प्रसाद यांची सोशल मीडियावर ओळख झाली होती.
त्यानंतर, प्रसादने या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले व फिरायला नेण्याच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने मित्राच्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. तरुणीने विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने टाळाटाळ केली. विवाहास नकार देऊन त्याने फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सिंहगड पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.