पुणे : कौटुंबिक कारणातून झालेल्या वादात डॉक्टरने पत्नीच्या हाताचा चावा घेऊन तिला शिवीगाळ करत गाडीवरून जोरात ढकलून दिले. याप्रकरणी आंबेगाव येथील २७ वर्षीय पत्नीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार खराडी येथील २७ वर्षीय डॉक्टरवर खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घोरपडे पेठ परिसरात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक कारणातून फिर्यादी आणि त्यांचे डॉक्टर पती या दोघांत वाद आहे. फिर्यादी या त्यांच्या पतीला भेटण्यासाठी ८ नोव्हेंबर रोजी त्यांच्या घोरपडे पेठ येथील क्लिनिकमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी आपण दोघे एकत्र राहून संसार करू, असे त्या पतीला म्हणाल्या. त्यानंतर आरोपी पती हा क्लिनिक बंद न करत तेथून निघाला. त्यावेळी फिर्यादींनी तू मला एकटीला सोडून जाऊ नको, असे म्हणत डॉक्टर पतीचा शर्ट धरला असता, पतीने त्यांच्या डाव्या हाताच्या दंडावर जोरात चावा घेतला.