वाकड (पिंपरी): घरात घुसून दमदाटी व मारहाण केल्याप्रकरणी पत्नीच्या भावासह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी 17 जानेवारीला वाकड येथे घडली आहे.
याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात अतुल सुधाकर बंड (वय 33 रा. वाकड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयुर मोतीराम इंगळे (रा. पारस, बाळापूर) आणि त्याचे तीन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पत्नी या घरी आल्या असता फिर्यादी यांनी त्यांना आत घेत घराचा दरवाजा बंद केला. यावेळी मयूर याने त्याच्या साथीदारांसह जबरदस्तीने घरात प्रवेश करत फिर्यादी यांना दमदाटी करून शिवीगाळ केली. तसेच मारहाण करत बघून घेण्याची धमकी दिली. त्यानंतर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.