शिक्रापूर : कारेगाव (ता. शिरुर) येथील एका विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. तेजश्री कृष्णा नाईक (वय २५ रा. कारेगाव ता. शिरुर जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत रेवणनाथ तुळशीराम होले (वय ५२ रा. होलेवाडी ता. कर्जत जि. अहमदनगर) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी कृष्णा हनुमंत नाईक, मीराबाई हनुमंत नाईक, राहुल हनुमंत नाईक, सायली राहुल नाईक (सर्व रा. कारेगाव ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरुद्ध विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींनी तेजश्रीकडे वारंवार माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. या सततच्या त्रासाला कंटाळून तेजश्री यांनी घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निळकंठ तिडके हे करत आहेत.