पिंपरी: मी भाई आहे, दारूचे दुकान चालवायचे असेल तर मला फुकटची दारू आणि दरमहा दोन ‘हजार रुपये द्यावे लागतील, अशी धमकी कोयत्याचा धाक दाखवून एकाने दिली. ही घटना मंगळवारी (दि.८) सकाळी खेड तालुक्यातील निघोजे येथे घडली. या प्रकरणी आनंद सुखदेव प्रसाद शर्मा (वय २१, निघोजे, खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रामदास हनपुडे (वय ३८) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी आरोपी रामदास हा शर्मा यांच्या दारूच्या दुकानावर आला आणि म्हणाला की, तू मला ओळखत नाही का? मी रामदास हनपुडे आहे, माझ्यावर किती गुन्हे आहेत तुला माहीत आहे का, मी इथला भाई आहे, असे म्हणून फिर्यादीला शिवीगाळ व धक्काबुक्की करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर रिक्षातील कोयता काढून तुला दारूचे दूकान चालवायचे असेल, तर मला महिन्याला दोन हजार रुपये व फुकट दारू द्यावी लागेल, अशी खंडणीची मागणी केली. तसेच हातातील कोयता हवेत फिरवुन मध्ये कोण आले तर एक एकाला जिवे मारील, अशी धमकी देवून दहशत निर्माण केली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.