पिंपरी : वाहन बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग आल्याने तरुणाला कोयत्याने व लाथाबुक्क्याने मारहाण केली. ही घटना काळेवाडीतील विजयनगर येथे घडली असून शनिवारी (दि.१) वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सोनू विनोद राम (वय २०, रा. भारतमाता चौक, काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. संकेत नानासाहेब चौधरी (वय २३, रा. साइ कॉलनी, विजयनगरम, काळेवाडी) याला अटक केली असून बाळ्या जकाते (रा. भारतमाता चौक, विजयनगर काळेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींना फिर्यादी यांनी गाडी बाजूला घेण्यास सांगितले. याचा राग आल्याने संकेत याने फिर्यादीच्या डोक्यात कोयत्याने तर. जकाते याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये जखमी झाले. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.