शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील संतोष सुभाष चौधरी या व्यक्तीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. याबाबत सचिन सुभाष चौधरी (वय 41 रा.निमगाव म्हाळुंगी) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी नवनाथ शिवाजी भोरडे, बाळू शिवाजी भोरडे, कोयना नवनाथ भोरडे, सुरेश भोरडे व बाळू भोरडे यांची पत्नी (सर्व रा. निमगाव म्हाळुंगी) यांच्याविरुद्ध संतोष चौधरी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
नवनाथ भोरडे यांची अल्पवयीन मुलगी संतोष चौधरी यांचा मुलगा सागर चौधरी यांनी पळून नेली आहे. याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असून पोलीस तपास सुरू असताना युवतीचे वडील व त्याच्या कुटुंबीयांनी सागरचे वडील संतोष यांना वारंवार भेटून शिवीगाळ, दमदाटी करत हाताने मारहाण केली. तसेच आमची मुलगी आणून द्या, आमच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली तर तुमचे घर पेटवून देण्याची धमकी दिली. चौधरी हे जिथे भेटतील तिथे त्यांना शिवीगाळ दमदाटी करत होते. त्यामुळे भोरडे यांच्याकडून वारंवार होणारा त्रास सहन न झाल्याने त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली .
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार व पोलीस हवालदार किशोर तेलंग करत आहे.