भोर : शिंद (ता. भोर) येथील ग्रामदैवताच्या जत्रेतील तमाशात रविवारी (दि.१२ मे) रांडा घालून हाणामारी करणाऱ्या १३ जणांवर भोर पोलिसांत एकमेकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोर पोलिसांनी सांगितले, की फिर्यादी हरीदास शैलाजी खाटपे (वय- ४५ वर्षे, रा. शिंद) यांच्या तक्रारीवरून अविनाश विलास भालेघरे, सूरज संभाजी भालेघरे, अभिजित बाळू भालेघरे, सौरभ संभाजी भालेघरे, विश्वजित राजाराम पाटणे, स्वप्नील अंकुश पाटणे (सर्व रा. शिंद), तसेच स्नेहा (पूर्ण नाव माहिती नाही, रा. गोगलवाडी) यांच्यावर, तर मनीषा ज्ञानोबा कुडले (वय ४२ वर्ष, रा. नाटंबी) यांच्या तक्रारीवरून हरिदास शैलाजी खाटपे, सचिन शैलाजी खाटपे, कुणाल यशवंत खाटपे, प्रसाद संभाजी खाटपे, साहिल सुनील खटपे, संजय अनंता खाटपे (सर्व रा. शिंद, ता. भोर) यांच्यावर एकमेकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अण्णा पवार करीत आहेत.