बापू मुळीक
पुरंदर : पुरंदर तालुक्यात सर्रास पद्धतीने तलाठी व मंडल अधिकारी सातबारा वरील चूक दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करत आहेत. असा आरोप ग्राहक हक्क संघर्ष समितीचे पुरंदरचे अध्यक्ष महेश राऊत यांनी केला आहे. कोर्टाच्या आदेश असताना त्यांचे पालन भूमी अभिलेख अधिकारी, तलाठी, मंडल अधिकारी हे पालन करताना दिसत नाही. कोर्टाच्या आदेशानुसार भूमी अभिलेख अधिकारी यांनी चार्ट सुद्धा चुकीचा बनवला. तोच वापर करून तलाठी व मंडल अधिकारी यांनी सातबारा व फेरफार वर नोंद करताना चुकीच्या नोंदी केल्या जात आहे.
सातबारा, फेरफार चुकीच्या नोंदी करून सामान्य शेतकऱ्याला आठ ते दहा महिने नुसते हेलपाटे मारायला लावतात. अजून सुद्धा दुरुस्ती करून देत नाही. चुकीच्या नोंदी केलेल्या तलाठी व मंडल अधिकारी यावर कारवाई होणार का? भूमी अभिलेख अधिकारी यावर सुद्धा कारवाई होणार का? यावर पुरंदर चे तहसीलदार व भुमि अभिलेखचे अधिकारी मॅडम काय निर्णय घेणार. कोर्टाच्या ऑर्डर प्रमाणे तलाठी व मंडल अधिकारी यांनी सातबारा व फेरफार वर नोंदी या करून देणार का? असे अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आहे.
यावर पुरंदरच्या तहसीलदार यांनीच निर्णय घ्यावा. पुरंदर तालुक्यामध्ये सर्वसाधारण संगणीकृत झाले आहेत. त्या संगणकीकृत सातबारा मध्ये अनेक चुका झालेल्या आहेत. त्या चुका दुरुस्तीसाठी शेतकरी तलाठी व मंडल अधिकारी याच्या कार्यालयाकडे हेलपाटे मारावे लागतात. परंतु तलाठी व मंडल अधिकारी पैसे घेतल्याशिवाय सातबारावर कोणत्याही प्रकारची चूक दुरुस्ती करत नाहीत. पैसे न दिल्यास वारंवार हेलपाटे मारायला लावत आहे. जुने हस्तलिखित सातबारा बंद झाले आहे.
काही शेतकऱ्यांनी तीन तीन महिने झाले, अर्ज दिले गेले आहेत. सातबारा वरील चूक दुरुस्ती न झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेती कर्ज, सोसायटी कर्ज घेतेवेळी यामध्ये फार त्रास होत आहे. तरी यावर खुद्द तहसीलदार यांनीच कारवाई करावी. अन्यथा ग्राहक हक्क संघर्ष समितीच्या वतीने 26 जानेवारी रोजी तहसीलदार कार्यालय पुरंदर यांच्यापुढे आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल. यासाठी लवकरात लवकर यावर तोडगा तहसीलदार यांनी काढावा. असे ग्राहक हक्क संघर्ष समितीचे पुरंदरचे अध्यक्ष महेश राऊत यांनी सांगितले.
कोर्टाच्या ऑर्डर प्रमाणे भूमी अभिलेख अधिकारी, यांनी चार्ट चुकीचा बनवला आहे पिसर्वे येथील ही घटना आहे. त्याच पद्धतीने तलाठी व मंडल अधिकारी यांनी सुद्धा सातबारा व फेरफार वर नोंद सुद्धा चुकीची बनवली आहे. हे तहसीलदार यांनी स्वतः मान्य केले आहे. त्यावर लवकरात लवकर सातबारा व फेरफारवर चुकीच्या नोंदी झालेल्या, या दुरुस्त करण्यासाठी आदेश देण्यात आले आहे.