पुणे : पीएमपीच्या चार ठेकेदारांना थकीत ९९ कोटी बिलापैकी ६६ कोटी रुपये दिल्याने संप आज मंगळवार (ता.७) पासून संप मागे घेतला आहे. त्यामुळे आजपासून पुर्ण १ हजार ४२१ बसेस पुन्हा मार्गावर धावणार आहेत. तर बससेवा पूर्ववत झाल्यामुळे प्रवास्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मे. ओलेक्ट्रा ग्रीनटेक लि., मे ईव्ही ट्रान्स प्रा. लि. व मे. ओहा कम्युट प्रा. लि व हंसा या ४ ठेकेदारांनी त्यांचे चार महिन्यांचे ९९ कोटी रुपयांचे बिल थकल्याने रविवारी (ता.५) अचानक संप पुकारला होता. अचानक संप पुकारल्याने प्रवाशांना हा त्रास सहन करावा लागला होता. तसेच प्रवाशांना रस्त्यावर थांबून तासनतास वाहनाची वाट पाहावी लागत होती.
पीएमपीच्या चार ठेकेदारांनी रविवार आणि सोमवार या दोन दिवशी संप पुकारल्याने प्रवाशांच्या या गैरसोईमुळे पुण्यातील सर्व राजकीय पक्ष एकत्र आले होते. आणि त्यांनी पीएमपीच्या अध्यक्ष यांची भेट घेऊन मिटविण्याची मागणी केली होती. त्यातील ६६ कोटी रुपये मिळाल्याने कंत्राटदारांच्या ९०७ बसेस पुन्हा संचलनात आणल्या आहेत. यावेळी पुढील थकीत बील ही लवकरच देण्यात येईल असे आश्वासन कंत्राटदारांना देण्यात आले आहे.
दरम्यान, हा संप मिटविण्यासाठी सोमवारी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेने ९० कोटी रुपये पीएमपी प्रशासनाला दिले. यात पुणे महापालिकेने ५४ कोटी तर पिंपरी चीचवड महापालिकेने ३६ कोटी रुपये दिले. त्यापैकी कंत्राटदारांचे ६६ कोटी रुपये देण्यात आले. तर, २४ कोटी रुपये हे’ एमएनजीएल’ चे देण्यात येणार आहे
. कंत्राटदारांचे नोव्हेंबर ते फेब्रुवारी असे चार महिन्यांचे बिल थकले होते. पैकी नोव्हेंबर ते जानेवारी असे तीन महिन्यांचे बिल सोमवारी देण्यात आलेयावेळी पीएमपीएमएलचे व्यस्थापकीय संचालक अध्यक्ष ओमप्रगकाश बकोरिया यांनी मंगळवार पासून सर्व सेवा पुर्ववत संचलनात असणार आहे, अशी माहिती दिली आहे.