मुंबई : भारत सरकारने आता एक मानक केबल बनवली आहे. मोबाइल फोन, लॅपटॉप, नोटबुक आणि इतर वस्तूंसाठी टाइप-सी चार्जिंग केबल्स मानक बनल्या आहेत. यामुळे यूजरला वेगळे चार्जर ठेवण्याची गरज भासणार नाही.
टाइप-सी केबलला स्टँडर्ड केबल म्हणून निश्चित केलं आहे. Type-c चार्जिंग केबलला मोबाइल फोन, लॅपटॉप, नोटबूक आणि इतर इलेक्ट्रॉनिक्ससाठी मानक केलं आहे. यामुळे युझरला आता वेगवेगळे चार्जर खरेदी करण्याची गरज नाही. नव्या मानकानुसार आता एकाच चार्जरमधून अनेक डिव्हाइस चार्ज केले जाऊ शकणार आहेत.
भारतीय मानक ब्युरो किंवा BIS ने म्हटले आहे की टाइप-सी मानक भारतात विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणासाठी असेल. यामुळे चार्जरची संख्या कमी होईल आणि लोक एकाच चार्जरने अनेक उपकरणे चार्ज करू शकतील. म्हणजेच ग्राहकांना प्रत्येक वेळी नवीन उपकरणासह वेगळा चार्जर घेण्याची गरज भासणार नाही. यामुळे भारत सरकारचे ई-कचरा कमी करण्याचे ध्येय साध्य करण्यात मदत होईल, असेही BIS ने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
जगभरातील देश सिंगल चार्जर या समस्येवर मात करण्यासाठी काम करत आहेत. डिसेंबर २०२२ मध्ये ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंह यांनी दावा केला होता की स्मार्टफोन, टॅब्लेट आणि लॅपटॉपसाठी यु. एस. बी. टाईप सी- चार्जिंग पोर्ट बनवण्यास भागधारकांनी सहमती दर्शवली आहे.
BIS ने टाइप सी चार्जरसाठी सिंगल चार्जर मानक देखील अधिसूचित केले. अलीकडेच युरोपियन युनियनने टाइप-सी केबलचे मानकीकरण करण्याचा आदेश पारित केला आहे.
दरम्यान, रोहित सिंग यांच्या मते, युरोपियन युनियनच्या २०२४ च्या टाइमलाइननुसार, कॉमन चार्जिंग पोर्ट अशा प्रकारे सोडले जाईल की उद्योग आणि ग्राहक ते सहजपणे स्वीकारू शकतील. सध्या फोन, टॅब्लेट आणि लॅपटॉपसाठी वेगवेगळे चार्जिंग पोर्ट वापरले जातात. तर आयफोन आणि अनेक अँड्रॉइड फोन्सचे पोर्टही खूप वेगळे आहेत. परंतु, या मानकानंतर, सर्व कंपन्यांना त्यांच्या उपकरणांसह टाइप सी चार्जिंग पोर्ट प्रदान करावा लागेल.