भिगवण : पिंपळे (ता. इंदापूर) येथे शेतातील वादावरून झालेल्या भांडणात परस्परविरोधी दोन्ही गटातील १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीषा संतोष तांबे (वय ३८, रा. शेटफळगढे, ता. इंदापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रदीप चोरमले (रा. पिंपळे), बाळू बंडगर, मनु बंडगर (दोघेही रा. मदनवाडी) आणि पवार आडनावाचे दोन पुरुष व दोन महिला या सात जणांविरुद्ध विनयभंग व रोख १८ ते २२ हजार, हातातील ३.५ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या काढून घेतल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनीषा तांबे या दि. ८ डिसेंबर रोजी पिंपळे येथील जमीन गट नंबर १२/१ मध्ये चारा काढत असताना प्रदीप चोरमले याने आपला उजवा हात पकडून अश्लील चाळे केले तर, तिथे आलेल्या बाळू बंडगर यानेही मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. बेकायदा जमावाने पतीला हाताने व दगडाने मारहाण केली आणि त्यांच्या खिशातील रोख रक्कम व हातातील सोन्याच्या अंगठ्या ओढून घेतल्या. तसेच जाताना मोबाइल फोडला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
दुसरी तक्रार अक्काबाई कार्तिक पवार (वय ४०, रा. मदनवाडी) यांनी दिली. त्यांच्या फियार्दीवरून संतोष तांबे, योगेश तांबे, सुमित तांबे, नाना ढवळे, प्रदीप उर्फ बाळू महानवर, मनीषा तांबे, मीना तांबे (सर्व रा. पिंपळे, ता. इंदापूर) यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी अॅक्ट व ७२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण झटापटीत काढून घेतल्याचे म्हटले