युनूस तांबोळी
शिरूर : शिरुर तालूका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने पदोन्नती झालेल्या किशोर जकाते, सचीन टेमगिरे, गितांजली टेमगिरे यांचा आचार्य भवन शिरुर येथे नुकताच सत्कार करण्यात आला आहे.
किशोर जकाते यांची मंञालयातील शिक्षण विभागात उपसचिव, सचीन टेमगिरे यांची विभागीय चौकशी अधिकारी पुणे तर गिंताजंली टेमगिरे यांची जीएसटी विभाग मुंबई येथे उपायुक्तपदी पदोन्नती झाली आहे. त्यांचा शिरुर तालूका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला पदवीधर शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष अनिल पलांडे, भुमी अभीलेखचे उपाध्यक्ष विनायक ठाकरे, पतसंस्थेचे चेअरमन नंदकुमार पडवळ , संचालक मानसी थोरात, शर्मिला निचित, संतोष विधाटे, चंद्रकांत खैरे, आंजली शिंदे, रामचंद्र नवले, कल्याण कोकाटे, संदीप थोरात, शिवाजीराव वाळके, प्रकाश नरवडे, राजाराम घावटे, राजेंद्र साठे, डाँ अनिल वाखारे, प्रदिप थोरात, विजय गोडसे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुञसंचालन अँड युवराज थोरात यांनी केले.
यावेळी बोलताना सचीन टेमगिरे म्हणाले की, शासनाची ध्येयधोरण कशाप्रकारे राबवली जातात त्याचा नियोजीत आराखडा करण्याचे काम केले जाते. त्यातून त्या विभागाच्या तळागाळात लाभ पोहचणे महत्वाचे आहे.
त्यासाठी सर्व स्तरातून पुढाकार मिळाला पाहिजे. शिरूर तालूका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे आर्थीक नियोजन उत्तम आहे अशी प्रशंसा करण्यात आली.