पुणे : अन्न व औषध प्रशासन विभागाने पुणे शहरात मोठी कारवाई केली आहे. टोनी दा ढाबा या कारवाईत वाहनाचा पाठलाग करून ४७ लाख २२ हजार ३०० रुपयांचा प्रतिबंधित साठा आणि एक वाहन जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली आहे. सध्या प्रतिबंधित पदार्थांचा अवैध साठा करणाऱ्यावर अन्न आणि औषध विभागाची धडक कारवाई सुरु आहे.
दरम्यान, या मोहमेअंतर्गत एक वाहन जप्त करण्यात आले आहे. तसेच चतुःशृंगी पोलिस स्टेशनमध्ये वाहनचालकासह तिघांवर एफआयआर दाखल केले आहेत. औषध प्रशासनाच्या मंत्रालयीन कार्यालयातून प्राप्त गोपनीय माहितीच्या अनुषंगाने ही मोहीम राबविण्यात आली आहे.
जनहित आणि जनआरोग्याच्या दृष्टिकोनातुन राज्यात गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखु, सुगंधित सुपारी इत्यादी तंबाखु जन्य पदर्थावर उत्पादक साठा, वितरण, वाहतुक तसेच विक्री यावर एक वर्षाकरीता बंदी घालण्यात आलेली आहे. तरी सुधा पुण्यात अनेक ठिकाणी वाहतूक आणि विक्री सुरु असल्याचं दिसून येत आहे. या संदर्भात माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासन विभाग धडक कारवाई करत आहे.
गैरप्रकार आढळून आल्यास अशी करा तक्रार
याबाबत प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रशासनामार्फत लवकरच विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. याप्रकरणी गैरप्रकार आढळून येणाऱ्या गुऱ्हाळ घरावर कडक कारवाई केली जाणार आहे. सणासुदीच्या काळात ग्राहकांची फसवणूक करुन कमी दर्जाचे अन्न पदार्थ विक्री करणाऱ्याविरुद्ध 1800-222-365 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.