पुणे : पुण्यातील हडपसर परिसरात वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. बापानेच आपल्या पोटच्या १४ वर्षाच्या मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. हा प्रकार सोमवारी २६ फेब्रुवारीला सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पीडित मुलीच्या घरात घडला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी नराधम बापावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहेत.
यापाराकारणी १४ वर्षीय पीडित मुलीने मंगळवारी २७ फेब्रुवारीला हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन ३५ वर्षीय नराधम बापावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. पीडित मुलगी घरात एकटी असताना आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाप हा हमालीचे काम करत आहे. सोमवारी सकाळी मुलीची आई कामानिमत्त बाहेर गेल्याने घरात आरोपी आणि मुलगी दोघेच होते. आरोपी बापाने अचानक तिच्याजवळ जाऊन तिच्या शरीराला अश्लील स्पर्श करुन तिच्यासोबत लैंगिक चाळे करायला सुरुवात केली. त्यानंतर मुलीचे तोंड दाबून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. घाबरलेल्या मुलीने हा प्रकार आईला सांगितल्यानंतर तिने मुलीला घेऊन हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी बापावर गुन्हा दाखल करुन अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा गोसावी करीत आहेत.