पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीने शारीरिक सबंध ठेवण्यास नकार दिल्याने नराधम बापाने ५ वर्षाच्या मुलीसोबत अश्लील वर्तन केले. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी आरोपी बापावर गुन्हा दाखल करुन बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकार १२ फेब्रुवारी रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास पीडित मुलीच्या राहत्या घरात घडला. याबाबत पीडित मुलीच्या २६ वर्षीय आईने १ मार्चला कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन २६ वर्षीय नराधम बापावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्यादी यांचा पती असून त्याने दारुच्या नशेत शरीर संबंधाची मागणी केली. मात्र, फिर्य़ादी यांनी त्याला नकार दिला. त्यामुळे आरोपीने त्याच्या पाच वर्षाच्या मुलीसोबत गैरवर्तन केले. फिर्यादी यांनी त्याला विरोध केला असता त्याने हाताने मारहाण केली. तसेच याबाबत कोणाला काही सांगितले तर घरातून हाकलून देईल अशी धमकी दिल्याचे फिर्य़ादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे करत आहेत.